अपक्षाला थारा नाहीच, मतदारांकडून भोपळा
नाशिक आणि मालेगाव मतदारसंघातून पहिल्या निवडणुकीपासून अपक्ष उमेद्वार अखंडपणे उभे राहत आले आहेत. कधी बंडखोरीचे राजकारण करीत, तर कधी नाराजी व्यक्त करीत, तर कधी इतर कारणाने उमेद्वार अपक्ष उभा राहण्यास प्रवृत्त झाल्याचे दिसते. मात्र जिल्ह्यात अद्याप एकाही अपक्षास सीट मिळालेले नाही. नाशिक व मालेगाव मतदारसंघात अपक्षाला मतदारांनी थारा दिला नाही, तर उलट भोपळाच दाखवला आहे.
नाशिक लोकसभा मतदार संघ आणि मालेगाव लोकसभा मतदार संघ यांची तुलना करता मालेगाव मतदार संघात अपक्ष उमेद्वारांचे प्रमाण बरेच कमी (सर्वाधिक 7 टक्के, सर्वात कमी 1 टक्का) असल्याचे स्पष्ट होते. याऊलट नाशिक लोकसभा मतदार संघाने बंडखोरीचे राजकारणाचा इतिहासच रचला आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात 1984 ते 1996 या काळात अपक्ष उमेद्वारांनी जणू शृंखलाच विणली. नाशिक मध्ये 1984 साली सर्वाधिक अपक्ष उमेद्वार उभे राहिले. त्याखालोखाल 1996 मध्ये नाशिक मतदार संघात 15 अपक्ष उमेद्वार उभे राहिले. मात्र त्यांस कोणतेही यश मिळाले नाही. मात्र 1998 व 99 साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेद्वारांची संख्या 15 वरुन 1 वर येवून पडली. त्यानंतर अपक्ष उमेद्वारांत पुन्हा सातत्याने वाढ झाल्याचे चित्र आहे. नाशिक मतदारसंघातून 2004 मध्ये 3, 2009 मध्ये 5, 2014 मध्ये 6 उमेद्वार अपक्ष उभे राहिले, तर 2018 मध्ये अपक्ष उमेद्वारांची संख्या 10 वर येवून पोहचली आहे.
मालेगाव मतदार संघात 1971 साली प्रथमच 2 अपक्ष उमेद्वार उभे राहिले. त्यानंतर सर्वाधिक म्हणजेच 7 अपक्ष उमेद्वार 1991 मध्ये रिंगणात उतरले. तर 2009 मध्ये 4, 2014 मध्ये 3 आणि 2018 मध्ये --- उमेद्वार अपक्ष म्हणून उभे राहिले. यावरुन अपक्ष उमेद्वारांनी संख्या मालेगाव संघात जोर करीत आहे.
1984 ची लोकसभा निवडणूक. यावेळी सर्वाधिक निवडणुका जिंकणारा म्हणून ख्याती मिळविलेले झामरु कहांडोळे देखील अपक्ष उभे राहिले होते. सर्वाधिक निवडणुका जिंकलेल्या असूनदेखील या चेहर्यास मतदारांनी भोपळाच दाखविला. मालेगाव मतदार संघाने अशी ओळख निर्माण केली आहे की, या संघात मतदार पक्षाऐवजी उमेद्वार पाहूनच मतदान करतात. त्यामुळे मालेगावने विविध पक्षांचे नेतृत्त्व अनुभवले. अपक्ष उमेद्वार यास अपवाद असल्याचे दिसते. मालेगाव संघात मतदारांनी कधीही अपक्षास थारा दिला नाही. त्यामुळेच कहांडोळे यांचा पराभव स्विकारावा लागला.
भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक व्यक्तीस निवडणूक लढविण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्यानुसार सर्वाधिक राजकीय पक्ष अशी ओळख असलेला आपला भारत देश. ज्यामध्ये देशपातळीवर प्रचलित असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, बहुजन समाज पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, जनतादल असे पक्ष आहेत. याशिवाय राज्यात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. ज्यापैकी काही प्रचलित आहेत, तर काहींचे फारसे अस्तित्त्व दिसून येत नाही. प्रादेशिक प्रचलित पक्षांमध्ये शिवसेना, मनसे आदींचा समावेश आहे. तर 1951 ते 1962 दरम्यान प्रजा समाजवादी पक्ष, शेड्युल्ड कास्ट फेडरेशन यांसारखे पक्ष प्रचलित राहिले.
याशिवाय असे अनेक पक्ष उदयास आले आणि मान्यता न मिळाल्याने अथवा आपले अस्तित्त्व निर्माण करु न शकल्याने लयास गेलेही. अशा पक्षांमध्ये आययुएमएल, केकेपी, सीपीआय. आरईपी, बीकेडी, डीडीपी, एसएचपी, दूरदर्शी, दलित पँथर, राष्ट्रीय पार्टी, समाजदल, लोकदल, सत्यगार्ग, अभाभनिसं, एबीएचएस, एनएमपी, भारतीय मायनॉरिटीज सुरक्षा, नॅशनल लोकतांत्रिक, बीबीएम, हिंदुस्थान जनता पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी अशा पक्षांचा समावेश राहिला आहे. मात्र काणत्याही अपक्ष अथवा स्थानिक पक्षांच्या उमेद्वारांच्या हाती नेतृत्त्व आलेले नाही. तरीदेखील अपक्ष उमेद्वारांची शृंखला अखंड आहे. किंबहुना शृंखला आणखी विणली जात असल्याने वाढतच आहे. म्हणजेच अपक्ष उमेद्वार वाढतच आहेत.
तृप्ती कानडे - शुक्ल
No comments:
Post a Comment