मालेगाव मतदारसंघात अद्यापपर्यंत सर्वाधिक मतदान
‘नाशिक‘मध्ये पक्षास प्राधान्य तर, ‘मालेगाव‘मध्ये उमेद्वारास प्राधान्य
मतदानाची टक्केवारी पाहता मालेगाव मतदारसंघ मतदान हक्क बजावण्यास सक्रीय आहे, तर तुलनेने नाशिक मतदार संघात मतदानाविषयी उदासिनता दिसून आलेली आहे. जरी नाशिक मतदार संघात सर्वाधिक 9 लाखाहून अधिक मतदान झाले असले तरी मतदारांच्या तुलनेत मतदानाची संख्या कमी असल्याने टक्केवारी कमी आहे.
1951 पासून आजतागायत पार पडलेल्या लोकसभा निवडणूकां मधील मतदानाची टक्केवारी पाहता तुलनात्मकदृष्ट्या जिल्ह्यातील मालेगाव मतदार संघात मतदानाची टक्केवारी अधिक राहिली आहे. पार पडलेल्या 17 निवडणुकांपैकी 5 निवडणुकांमध्ये 62 टक्के प्लस मतदान झाले आहे. तर नाशिक लोकसभा मतदार संघात मतदानाबाबत तुलनेने निष्क्रियता दिसते. या संघात 17 लोकसभा निवडणुकांपैकी केवळ एकच वेळा 60 टक्के प्लस मतदान झाले आहे.
दोन्ही मतदार संघातील मतदानाची आकडेवारी पाहता सर्वाधिक मतदान नाशिक मतदार संघात झाले आहे. मात्र एकूण मतदार संख्येच्या तुलनेत मतदारांची संख्या कमी असल्यामुळे नाशिक लोकसभा मतदार संघात कमी मतदान झाल्याचा निष्कर्ष योग्य ठरतो.
नाशिक लोकसभा मतदार संघात 1967 साली आजपर्यंत सर्वाधिक म्हणजेच 65.79 टक्के मतदान झाले. त्याखालोखाल 2014 मध्ये 58.83 टक्के, 1999 मध्ये 57.88 टक्के, 1971 मध्ये 57.35 टक्के, 1984 मध्ये 56.51 टक्के, 1989 मध्ये 54.84 टक्के, 1877 मध्ये 54.70 टक्के, 1962 मध्ये 54.18 टक्के, 1980 मध्ये 53.42 टक्के, 1951 मध्ये 53.17 टक्के, 1998 मध्ये 51.65 टक्के, 1991 मध्ये 50.72 अशा प्रकारे मतदान झाले. 1967 च्या चौथ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिक मतदार संघात सर्वाधिक (65.79 टक्के) मतदान झाले यावेळी नाशिक मतदार संघातून इंडियन नॅशनल काँग्रेसचे भानुदास कवडे निवडून आले.
नाशिक मतदार संघातून ज्या ज्या वेळी 50 टक्के हून अधिक मतदान झाले, त्या त्या वेळी काँग्रेस पक्षाचे नेतृत्त्व आहे. तर, ज्या वेळी 55 टक्के किंवा त्याहून अधिक मतदारांनी मतदान करीत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे त्यावेळी इतर पक्ष निवडून आल्याचे दिसते. 2014 मध्ये बीजेपी चे हेमंत गोडसे, 1989 मध्ये बीजेपी चे दौलत आहेर, 1999 मध्ये शिवसेनचे उत्तमराव ढिकले आणि 1977 मध्ये बीएलडी पक्षाचे विठ्ठलराव हांडे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्त्व पाहिले.
त्याचप्रमाणे तत्कालिन मालेगाव मतदार संघ आणि 2009 नंतर झालेला दिंडोरी मतदार संघात आजपर्यंत जिल्ह्यातील सर्वाधिक टक्के मतदान झाल्याचे चित्र दिसते. 1962 मध्ये मालेगाव मतदार संघात 66.76 टक्के इतके सर्वाधिक मतदान झाले. त्याखालोखाल 1999 मध्ये 64.50 टक्के, 2014 मध्ये 63.41 टक्के, 1957 मध्ये 63.40 टक्के, 1967 मध्ये 62.59 टक्के, 1984 मध्ये 55.93 टक्के, 1971 मध्ये 55.89 टक्के, 1989 मध्ये 52.02 टक्के आणि 1977 मध्ये 51.74 टक्के मतदान झाले. मालेगाव लोकसभा मतदार संघात ज्यावेळी सर्वाधिक (66.76 टक्के) टक्के मतदान झाले त्या वेळी (1962 साली) संघात भारतीय राष्टीय काँग्रेस पक्षाचे नेतृत्त्व राहिले.
मालेगाव मतदार संघातून ज्या ज्या वेळी 55 ते 62 टक्के दरम्यान मतदान झाले आहे त्या त्या वेळी मालेगाव मतदार संघात काँग्रेस पक्षाचे नेतृत्त्व दिसते. एवढा एकच निष्कर्ष काढता येतो. अन्यथा मालेगाव मतदार संघात कोणत्याही एकाच पक्षाचे नेतृत्त्व दिसत नाही. थोडक्यात मालेगाव मतदार संघ पक्ष पाहून नव्हे तर उमेद्वार पाहून मतदान करण्यास प्राधान्य देतो, असे म्हणणे योग्य ठरते. याशिवाय झामरु मंगळु कहांडोळे यांनी मालेगाव मतदार संघातून तब्बल 8 वेळा भारतीय काँग्रेस पक्षाची उमेद्वारी करीत निवडणूक जिंकून तब्बल 5 वेळा काँग्रेसचे नेतृत्त्व केले आहे.
सर्वाधिक टक्के मतदान ते सर्वात कमी मतदान याप्रमाणे आलेख पाहता मालेगाव मतदार संघात जनतादल, बीजेपी, पीएसपी, काँग्रेस या पक्षांच्या उमेद्वारांनी नेतृत्त्व केले आहे. त्याप्रमाणे 1999 मध्ये जनतादलाचे हरीभाऊ महाले, 2014 मध्ये भाजप चे हरिश्चंद्र चव्हाण, 1957 मध्ये प्रजा समाजवादी पक्षाचे यादव नारायण जाधव, 1989 व 1977 मध्ये जनतादलाचे हरीभाऊ महाले, तसेच 1967, 1984,1971 मध्ये काँग्रेसच्या अनुक्रमे झामरु कहांडोळे, सिताराम भोये, झामरु कहांडोळे या नेत्यांनी संघाचे नेतृत्त्व केले आहे.
तृप्ती कानडे - शुक्ल
No comments:
Post a Comment